समजून घेना Samjun Ghena Lyrics

समजून घेना Samjun Ghena Lyrics – Harshavardhan Wavre Lyrics

Singer Harshavardhan Wavre
Music Amitraj
Song Writer Kshitij Patwardhan

समजून घे ना…

नाजूकशा,
फुलाला या,
रागाचा रंग का?

मनाची या,
वाट तुझी,
मलाच बंद का?

किनारा तूच माझ्या, दर्याचा!
चांदवा तूच गं या सूर्याचा!

ऐक ना..
बघ ना…
हस ना…

समजून घे ना!
समजून घे ना…

अंतरा:
भोवरा मनाचा तुझ्याच पाठी फिरे,
क्षण हा प्रेमाचा तुझ्याचसाठी झुरे,
जाऊ नको दूर तू,
लावून हुरहूर तू…

समोर मी,
समोर तू,
तरीही लांब का?

आतुर मी,
आतुर तू,
तरी ही थांब का ?

किनारा तूच माझ्या, दर्याचा!
चांदवा तूच गं या सूर्याचा!

ऐक ना..
बघ ना…
हस ना…

समजून घे ना!
समजून घे ना…