ओघा ओघानी Ogha Oghani Lyrics – Jasraj Joshi, Aanandi Joshi Lyrics

Singer | Jasraj Joshi, Aanandi Joshi |
Music | Hrishikesh Saurabh Jasraj |
Song Writer | Abhishek Khankar |
चालता.. बोलता..
ओघा ओघानी
घेतली, कधी दिली
कबुली दोघांनी
ही कथा की नवी गजल..
की वाट ही मजल दरमजल..
जरासा.. उसासा..
जरासा.. दिलासा तू दिला असा..
चालता.. बोलता..
ओघा ओघानी
घेतली, कधी दिली
कबुली दोघांनी
ना कळे.. कुणामुळे..
झाली गाठभेट..
हवी हवी.. सफर नवी../सहल नवी..
झाली सुरूच थेट..
वाटा न जाणलेल्या..
लाटा उधाणलेल्या.. सोबती तुझ्या..
नि माझ्या सोबती तू..
चालता.. बोलता..
ओघा ओघानी
घेतली, कधी दिली
कबुली दोघांनी
जिथे नजर, तिथे हजर,
सारे तुझेच भास..
पडे विसर, तुझा असर,
कसला गोड त्रास..
सारे नवेनवेसे वाटे हवेहवेसे
सोबती तुझ्या..
रहा ना सोबती तू..
चालता.. बोलता..
ओघाओघानी..
घेतली.. कधी दिली..
कबूली दोघांनी..